होय, सोरायसिस योग्य आयुर्वेदिक उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो..!

आज २१ व्या शतकात झालेल्या सामाजिक, आर्थिक प्रगतीचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. नवीन तंत्रज्ञान, संगणक, आधुनिक तंत्र कौशल्य यामुळे आपल्या सर्वांचेच जीवन सुखकर होताना आढळतेय.

वैद्यकीय क्षेत्रामध्येही आज या तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रगती होताना आढळतेय. अगदी कोरोना संक्रमणावरही आज लस उपलब्ध झाली आहे. तरीदेखील काही आजार आजही वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हानात्मक ठरतायेत. त्यापैकी एक सोरायसिस या आजाराविषयी आपण जाणून घेऊयात आणि नाडीचिकित्सा सोरायसिसवर कोणत्या प्रकारे प्रभावी ठरतेय हे जाणुन घेऊयात.

सोरायसिसमध्ये सर्वसाधारणपणे अंगावर चंदेरी रंगाचे चट्टे येणे, अंगावरील त्वचेचे पापुद्रे निघुन येणे, त्वचा नाजुक लालसर होणे, हातापायांना वारंवार भेगा पडणे, वारंवार हट्टी स्वरूपाचा कोंडा केसांमध्ये होणे अशी त्वचेशी संबंधीत लक्षणे आढळतात. काही वेळेस या आजारांचा परिणाम नखांवर देखील होताना आढळतो.

सोरायसिसचा परिणाम नखांवर होताना नखे काळी पडणे, जाड होणे, ठिसूळ होणे या स्वरूपात लक्षणे आढळतात.

मात्र काही व्यक्तींमध्ये  सोरायसिस या आजाराचा परिणाम सांध्यावरही होतो आणि या व्यक्तींना संधिवाताप्रमाणे लक्षणे आढळतात ज्यामध्ये सांध्यांना सुज येणे, सांधे अवघडुन जाणे, मोठ्या प्रमाणात सांधे दुखणे अशी लक्षणे असतात.

सोरायसिसच्या रुग्णांच्या बाबतीत बऱ्याचदा भरपुर औषधे, मलमे आणि पथ्ये पाळुन देखील आजार पुर्णतः जात नाही आणि त्यासोबत असा सोरायसिस बराच होत नाही का? असा नकारात्मक विचार या रुग्णांच्या मनात येऊ लागतो. तर या प्रश्नाचे उत्तर नाडी चिकित्सेमध्ये आहे.

खरंतर आधुनिक शास्त्रानुसार आपला शरीरावरील बाह्य त्वचा पुर्ण विकसित झालेल्या पेशींपासुन बनलेली आहे. शरीरामध्ये नवनिर्मित पेशी साधारणतः २५ ते ३० दिवसांमध्ये पुर्ण विकसित होतात. मात्र सोरायसिस रुग्णांमध्ये या पेशी विकसित होण्याचा कालावधी ५-७ दिवसांचा होतो. ज्यामुळे त्वचेवर अतिरिक्त विकसित पेशींचा थर जमा होतो आणि तो पापुद्रे स्वरूपात निघुन येऊ लागतो.

पेशी अतिरिक्त विकसित होण्यामागे काही शास्त्रज्ञांच्या मते या रुग्णांच्या रोग प्रतिकार शक्तीमध्ये झालेले बदल कारणीभुत ठरतात. काही संशोधनानुसार हा विकार जनुकीय तंत्रामध्ये बिघाड झाल्याशी निगडित आहे.

आता हे रोगप्रतिकार शक्तीमधील अथवा जनुकीय तंत्रातील बदल कोणत्या कारणास्तव झाले आहेत. याचे ठोस कारण माहिती नसल्याने बऱ्याचदा  सोरायसिस बाबतीत औषधोपचार करताना लक्षणांवरून औषधे दिली जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने Disease Modifying औषधे Steroid युक्त मलमे, खाज कमी करणारी औषधे, Moisturizing Cream यांचा वापर होतो.

ही औषधे केवळ लक्षणांना कमी करणारी असल्याने जोपर्यंत औषधे सुरु आहेत तोपर्यंत लक्षणे कमी झाल्यासारखी वाटतात. औषधे कमी केली अथवा खंड पडल्यास आजार पुन्हा उदभवतो आणि वर्षानुवर्षे औषधे घेऊन देखील सोरायसिस  पुर्णतः जात नाही. तेव्हा सोरायसिस बरा होत नाही का? असा विचार मनात येतो.

या ठिकाणी नाडीचिकित्सा नक्कीच फलदायी ठरू शकते. सोरायसिस या विकारामध्ये केवळ लक्षणांचा विचार करण्यापेक्षा ही लक्षणे का उत्पन्न झालेली आहेत हे जाणुन घेणे महत्वाचे असते.

जरी लक्षणे त्वचेवर उत्पन्न होत असली तरी या आजाराशी निगडित बिघाड शरीरामध्ये झालेले असतात आणि नेमके हे शरीरातील बिघाड नाडीवैद्य नाडीपरीक्षेद्वारे समजुन घेऊ शकतो.

आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील वात-पित्त-कफ या त्रयदोषांमधील असमतोल जेव्हा घडतो आणि शरीरामध्ये हे दोष अतिरिक्त प्रमाणात संचित होऊ लागतात. तेव्हा ते शरीरातील रक्त धातु दुषित करतात. रक्त आणि त्वचेचा आश्रयाआश्रयी संबंध असल्याकारणाने रक्तातील दोष त्वचेशी संबंधित लक्षणे उत्पन्न करतात.

नेमके कोणते दोष शरीरामध्ये संचित आहेत हे नाडी परीक्षेद्वारे जाणुन घेऊन चिकित्सासुत्र ठरवल्यास सोरायसिसची लक्षणे पुर्णतः बरी होताना आढळतात.

सोरायसिसशी संबंधित लक्षणे, दोष वाढण्यामागे आपल्या आहारातील काही गोष्टी जसे कि अति अम्ल पदार्थ, आंबवलेले पदार्थ , शिळे अन्न, दुध आणि फळे एकत्रत्वाने, Preservatives युक्त पदार्थ, Fast Food कारणीभुत ठरू शकते.

तसेच राहणीमानामध्ये झालेले बदल जसे की, अतिरिक्त Stress, रात्रीचे जागरण, अवेळी जेवण, अतिरिक्त थंड, कोरडया वातावरणामध्ये राहणे हे देखील या आजाराला उत्पन्न होण्यास कारणीभुत ठरते.

काही रुग्णांच्या बाबतीत पुर्वी झालेल्या आजारांचा परिणाम शरीरावर होतो आणि त्यातुनही  सोरायसिसशी निगडित लक्षणे उत्पन्न होतात. एवढेच काय जुनाट मलावष्टंभासारखा आजार देखील सोरायसिससारख्या आजाराला आमंत्रण देऊ शकतो.

नाडीपरीक्षेद्वारे सोरायसिस रुग्णांच्या शरीरामध्ये झालेले शारीरिक, मानसिक बदल, शरीरातील दोषस्थिती, यकृताचे कार्य, पचन संस्था, शरीरात वाढलेली उष्णता यांचा बारकाईने विचार करून केवळ बाह्य स्वरूपातील औषधे न देता अभ्यंतरतः पोटातुन घ्यायची विशिष्ट औषधे जसे की रक्तशुद्धी करणारी मंजिष्ठा, गुळवेल, हरिद्रा, कडुनिंब, त्रिफळा, यांसारख्या वनस्पतींचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. तसेच त्वचेचा येणारा कोरडेपणा, अतिरिक्त पापुद्रे निघणे, कोंडा कमी होण्यासाठी शतावरी, अनंतमुळ , विडंग, मंजिष्ठा यांसारख्या औषधींचा वापर युक्तिपूर्वक केल्यास  सोरायसिस नक्कीच कमी होऊन बरा होऊ शकतो.

सोरायसिसच्या रुग्णांनी नियमित सर्वांगाला तीळ तेल अथवा खोबरेल तेलाने अभ्यंग केल्यास अतिशय गुणकारी ठरते.

नाडी चिकित्सा  सोरायसिस  सारख्याच इतर किचकट त्वचाविकारांवर जसे की Eczema, Lichen Planus, त्वचेच्या ऍलर्जी, खाज येणे , वारंवार होणारे Fungal Infection यांवर उपयुक्त ठरते.